*शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांचा नगराध्यक्ष संजू परब यांना इशारा*
*💫सावंतवाडी दि.०३-:* गेले काही दिवस नगराध्यक्ष संजू परब हे शिवसेना नेत्यांवर खालच्या पातळीवर जाऊन टिका करत आहेत. त्यांनी सर्व प्रथम निवडणूकित दिलेली आश्वासन पूर्ण करावी नंतर शिवसेना नेत्यावर टिका करावी. असा सल्ला तालुका प्रमुख रूपेश राऊळ यांनी पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष संजू परब याना दिला आहे. यावेळी ते म्हणाले की, यांच्या नेत्यांना जे जमल नाही ते आमच्या नेत्यांनी करून दाखल आहे. तसेच बाबूराव धुरी हे दोडामार्ग तालुक्यातील सक्षम नेतृत्व असून त्यांनी पालकंमंत्र्यांनी बांदा -दोडामार्ग रस्तासाठी निधी देण्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे फुक्याचे श्रेय घेण्यासाठी संजू परब आशी वक्तव्य करत आहेत असे देखील ते म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी हिम्मत असेल तर पालकमंत्र्यांची तिरडी यात्रा एक पाऊल तरी काढून दाखवावी असे सांगत त्यांची तिरडी उचलण्यासाठी नगरसेवक बाबू कुडतरकर सक्षम आहेत. असे सांगत त्यांच्या टीकेला प्रतिउत्तर दिले आहे.
