आ प्रवीण दरेकर यांचा संविधान समर्थ रॅलीत प्रश्न
⚡कुडाळ ता.२१-: आज देशात काय परिस्थिती आहे.ज्यांनी देशात आणीबाणी लावली त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत.महाराष्ट्रात तुमचं सरकार असताना संविधानाला अनुसरून काम केलात का?असा सवाल उद्धव ठाकरेना करत दरेकरानी लक्ष्य केले.संविधानाला पाठबळ देण्यासाठी ही संविधान बचाव रॅली आहे.हा विषय भास्करचा नाही किंवा वैभवचा नाही.या बाजार बुडग्यांना महत्व देण्याच कारण नाही आहे. पंतप्रधानांवर अंग आक्षेप करणारा हा भास्कर जाधव आहे.दहा ठीकाणी शेन खाऊन आलेला हा भास्कर जाधव उध्वव ठाकरेंचा कडवट शिवसैनिक वाटतो काय?असा सवाल करत आमदार प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेला लक्ष्य केले.कुडाळातील संविधान समर्थन रॅलीत ते बोलत होते.
