⚡बांदा ता.२१-: धाकोरा-सड्यावरील दोन एकर क्षेत्रात असलेल्या नाचणी व भुईमूग पिकाचे गव्या रेड्यांच्या कळपाने नुकसान केले आहे. भुईमूगाचे पीक पूर्णपणे तयार झालेले होते. मात्र गव्यांनी नासधुस केल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. यात आमचे अंदाचे 30 हजारांचे नुकसान झाले असून वनविभागाने पंचनामा करावा अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
धाकोऱ्यात सड्यावरील दोन एकर क्षेत्रात गवारेड्यांकडून नाचणी, भुईमूगाची नासधूस
