सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या कार्यकारी समितीवर किरण सामंत, प्रमोद जठार यांनी नियुक्ती करा

शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

⚡कणकवली ता.२१-: सिंधूरत्न समृद्ध योजनेच्या कार्यकारी समितीवर माजी आमदार प्रमोद जठार व उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू उद्योजक किरण सामंत यांची या समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्त करण्यात यावी अशी मागणी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

सिंधूरत्न समृद्ध योजनेच्या कार्यकारी समितीवर यापूर्वी करण्यात आलेल्या विशेष निमंत्रित सदस्यांच्या यापूर्वी केलेल्या नियुक्ती रद्द करत त्याजागी नवीन नियुक्ती करण्याची मागणी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

You cannot copy content of this page