सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन दर महिन्याच्या १ तारखेलाच जमा करा

कणकवली पंचायत समिती पेन्शन अदालतीत मागणीला प्रतिसाद

⚡कणकवली ता २१-: कणकवली विकास गटाच्या पंचायत समितीची पेन्शन अदालत गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या अदालतीत सेवानिवृत्त कर्मचा-यांची पेन्शन दर महाच्या १ तारखेलाच व्हावी हा पहिला मुद्दा होता. त्याला पिठासन अधिकारी यांनी जिल्ह्याहून येणाऱ्या रकमेबाबत मला निश्चित काही सांगता येणार नाही परंतु माझ्या कार्यालयाकडे रक्कम जमा होताच ती ताबडतोब नवीन कार्यप्रणालीनुसार पेन्शनसंच्या खात्यावर तात्काळ जमा करण्यात येईल आमच्याकडून कोणताही विलंब होणार नाही असे सांगितले.

त्यानंतर गहाळ सेवापुस्तकें, पदवीधर श्रेणीधारक शिक्षक, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांच्या निवडश्रेणी वेतन निश्चितीबाबतची स्थिती, ज्यांच्या वारसांचा नोट पत्ता सापडत नसल्यामुळे ७ शिक्षकांच्या रकमा देय्य आहेत त्यांचा शोध घेणे. सन २०१३ पासून प्रलंबित असलेली स्वग्राम प्रवास भत्ता देयक दि. ०१/०१/१९६८ पासून सेवेत रुजू झालेल्या निवडश्रेणी पात्र शिक्षकांची अद्यावत यादी तयार करणे व अन्य वैयक्तिक प्रलंबित प्रश्न यांच्यावर सखोल चर्चा करण्यात आली. याशिवाय नव्याने प्राप्त झालेल्या निवेदनांचा विचार करून त्यांना त्यांचे लाभ त्वरित देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला

कणकवली तालुक्यात सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांची सेवापुस्तकांची संख्या खूप असल्याने गट विकास अधिकाऱ्यानी त्यांना दोन लोखंडी कपाटे देणे व नादुरुस्त रेकार्ड रूम बदलून तो चांगल्या इमारतीत घेणे याबाबत सुरेश पेडणेकर यांनी निवेदन सादर केले. त्यावर गट विकास अधिकारी अरूण चव्हाण यांनी रेकॉर्ड रूम आम्ही चांगल्या इमारतीत हलवत असल्याचे सांगितले. तर अनिल माळवदे यांनी कणकवली तालुका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक: असोसिएशनच्यावतीने दोन लोखंडी कपाटे देण्याचे जाहीर केले त्यांचे सवानी आभार मानले.

या अदालतीसाठी प्रशासनाच्यावतीने सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन भोई, गट शिक्षणाधिकारी किशोर गवस, प्रशासन अधिकारी सी. डी. परब, मनिषा देसाई, निलम जाधव, मृणाल शेटये, विवेक जाधव, संजय धुरी, आनंद जाधव हे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या अदालतीत दादा कुडतरकर, सुरेश पेडणेकर, रविंद्र मुसळे, प्रकाश दळवी, अनिल माळवदे, व्ही. के. चव्हाण, तांबे इत्यादींनी चर्चेत भाग घेतला अदालतीत सर्वांनी चांगला सहभाग घेतल्याचे गटविकास अधिकारी यांनी नमूद केले. रविंद्र मुसळे यांनी पेन्शनर्सच्यावतीने तर गटशिक्षणाधिकारी यांनी प्रशासनाच्यावतीने आभार मानून अदालत संपल्याचे जाहीर केले.

You cannot copy content of this page