माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांचा आरोप : अधिकारी व ठेकेदारांची मिलीभगत
⚡सावंतवाडी ता.२१-: सावंतवाडीतील बांधकाम विभाग जनतेच्या पैशाचा अपव्यय करत असून, गरज नसलेल्या भागात दिशादर्शक फलक लावून, अधिकारी व ठेकेदारांकडून जनतेच्या पैशावर ताव मारला जात असल्याचा आरोप माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी केला आहे.
