कर्मचाऱ्यांच्या पगाराखातीर राष्ट्रवादीची बीएसएनएल कार्यालयावर धडक

दिवाळी पूर्वी दोन महिन्याचा पगार देण्याचे दिले आश्वासन : पुंडलिक दळवींच्या नेतृत्वाखाली धडक

सावंतवाडी ता.२१-: गेले २८ महिने बीएसएनएल कर्मचाऱ्यांचे पगार न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी येथील सावंतवाडी बीएसएनएल कार्यालयात धडकले व अधिकाऱ्यांना जाब विचारला. कर्मचाऱ्यांना पगार किती दिवसात मिळेल याची हमी द्या त्यानंतर आम्ही कार्यातून बाहेर पडणार असल्याचा इशारा दिल्यानंतर दिवाळी पूर्वी आम्ही दोन महिन्याचा पगार देऊ अशी ग्वाही आक्रमक झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना दिली.

याबाबतचे अधिक माहिती अशी की बीएसएनएल कर्मचाऱ्यांचे गेले 28 महिने पगार रकडून ठेवल्याने कर्मचारी सर्व आक्रोश झाले होते त्यामुळे त्यांनी येथील राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची भेट घेत याबाबतची माहिती दिली त्यानंतर राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवीच्या नेतृत्वाखाली त्यांनी आज येथील धडक देत याबाबत जाब विचारण्यात आला. दिवाळी सण तोंडावर आला असताना अद्याप कर्मचाऱ्यांचे पगार का होत नाहीत असा प्रश्न देखील पुंडलिक दळवी या विचारले यावेळी अधिकाऱ्यांनी दोन दिवसात होणार असल्याचे आश्वासन दिले. दरम्यान दोन दिवसात न झाल्यास तर राष्ट्रवादी वेगळ्या पद्धतीने धडक दिल असा इशारा देखील पुंडलिक दळवी यांनी दिला.

यावेळी शहराध्यक्ष देवा टेमकर, इफतिगार राजगुरू, बावतिस फर्नांडिस हर्षद बेग दी उपस्थित होते.

You cannot copy content of this page