सेवांगण येथे ‘मुक्तावकाश ते युक्तावकाश’ नाट्य कार्यशाळा संपन्न

⚡मालवण ता.२०-: बॅ. नाथ पै सेवांगण मालवण तर्फे मुक्तावकाश ते युक्तावकाश” हे एक दिवसीय नाट्य प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले. मुक्तावकाश ते युक्तावकाश”- मुक्काम पोस्ट एम्पटी स्पेस व्हाया पिटर ब्रूक हा या कार्यकशाळेचा मुख्य उद्देश होता. भरतमुनी ते पिटर ब्रूक या कालखंडातील म्हणजेच पौर्वात्य ते पाशिमात्य रंगभूमीविषयक दृक श्राव्य माध्यमाद्वारे कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी प्रमुख व्याख्याते दिग्दर्शक अभिनेते, लेखक अरुण कदम यांनी मार्गदर्शन करताना नाट्यक्षेत्राची झालेली उत्क्रांती, त्यात वेळोवेळी झालेली स्थित्यंतरे याची सांगोपांग माहिती उलगडून सांगितली.

या कार्यशाळेचे उदघाट्न अरुण कदम यांच्या हस्ते नटराजाच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून झाले. संस्थेचे कार्यवाह श्री. लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी सर्वांचे गुलाब पुष्प देवून सर्वांचे स्वागत केले. संस्थेचे अध्यक्ष ऍड. देवदत्त परुळेकर हे या कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी प्रमुख वक्ते अरुण कदम यांनी नाट्यक्षेत्राशी असलेले रंगभूमीचे प्रकार, त्यातील महत्वाच्या जागा व त्या जागेचे असलेले महत्त्व स्पष्ट करून सांगितले. नाट्यकलाकार हा नाट्याशी संबंधित असतो. परंतू, नाटक पाहताना श्रोते म्हणून आपण ते कसे पाहावे व त्या नाटकातील आशय समजून घ्यावा ही खुपचं महत्वाची माहिती कदम यांनी दिली.

या कार्यशाळेत उपस्थित असलेल्या प्रशिक्षणार्थीकडून छोटे गट तयार करून त्याद्वारे लहानसे नाट्यप्रयोग अरुण कदम यांनी करवून घेतले. यातील काही त्रुटी त्यांनी दाखवून दिल्या. या कार्यशाळेसाठी मन्वंतर कला अकादमी या संस्थेचे सरचिटणीस व कलाकार चिंतूजी वालकर, राजदत्त तांबे हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी दाखवण्यात आलेली चित्रफित दाखवण्याची तांत्रिक बाजू नाट्य कलाकार कु. निहारीका राजदत्त यांनी सांभाळली. अध्यक्ष ऍड. देवदत्त परुळेकर यापुढेही असे कार्यक्रम राबवू असे सांगितले. यांनी केले. संस्थेचे कार्यवाह श्री. लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी अरुण कदम आणि त्यांच्या टीमचे आभार मानले. सूत्रसंचालन संस्थेचे व्यवस्थापक संजय आचरेकर यांनी केले.

शेवटी सदर कार्यक्रम यशस्वी होण्यास सेवांगण कर्मचारी वृंद यांचे सहकार्य लाभले…

You cannot copy content of this page