मालवण शासकीय तंत्रनिकेतनमध्ये जागतिक अन्न दिन साजरा

⚡मालवण ता.२०-: शासकीय तंत्रनिकेतन मालवण येथे अन्न तंत्रज्ञान विभागाकडून जागतिक अन्न दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना अन्न तंत्रज्ञानातील सध्याची प्रगती व दिशा या अनुषंगाने मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना उद्योजक होण्यासाठी प्रोत्साहित करत अन्न प्रक्रिया उद्योगातील संधी व कौशल्ये, त्यासाठीच्या शासकीय योजना याबाबत माहिती देण्यात आली.

यावेळी डाॅ. हेडगेवार प्रकल्पाचे अध्यक्ष सुनील उकिडवे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले व क्रीमबर्ग कंपनीचे मालक रघुनाथ राणे उपस्थित होते. शासकीय तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्यांमधून उद्योजक घडावेत यासाठी डाॅ. हेडगेवार प्रकल्पाकडून सर्व प्रकारचे सहकार्य नेहमी केले जाईल, असे प्रकल्पाचे अध्यक्ष सुनील उकिडवे यांनी यावेळी सांगितले.

यानिमित्ताने प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत प्रथम- राजस शेणई, द्वितीय- रोहन सावंत, तृतीय- ऋतुराज मालणकर यांनी यश मिळविले. यावेळी अन्न तंत्रज्ञान विभागाचे विभाग प्रमुख प्रकाश शिरहट्टी, प्रा. संजय तलवारे, प्रा.राहुल बोर्डे, प्रा.गणेश सामंत उपस्थित होते. सूत्रसंचालन स्वानंद सप्रे याने केले तर मैथिली मांजरेकर हिने आभार मानले.

You cannot copy content of this page