बांदा केंद्रशाळेत चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण

⚡बांदा ता.२०-: राधारंग फौंडेशनच्या वतीने इयत्ता तिसरी व चौथी गटासाठी आयोजित चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण बांदा जिल्हा परिषद केंद्रशाळा नंबर १ येथे करण्यात आले.
यावेळी फौंडेशनचे गुरुनाथ नार्वेकर, बांदा केंद्रशाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, अभिनेते गुणेश गवस, प्रशांत गवस, अवधूत गावडे, वैष्णवी गावडे, सौ. सावंत, शिक्षक वंदना शितोळे, प्रशांत पवार, जे. डी. पाटील, गोपाळ साबळे आदी मान्यवर उपस्थित होते. सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे (प्रथम तीन क्रमांकानुसार)
तिसरी गटात स्वरा रुपेश चरकरी (जिल्हा परिषद शाळा मळगाव ), पार्थ उमेश सावंत (सुधाताई कामत विद्यामंदिर सावंतवाडी ), काव्या सूर्यकांत चव्हाण (जिल्हा परिषद केंद्रशाळा, बांदा ) यांनी प्रथम तीन क्रमांक मिळविले. भूमी उत्तम मेस्त्री (जिल्हा परिषद शाळा, मळगाव) व दुर्वा संजय माथर (शांतीनिकेतन इंग्लिश प्रयमरी स्कुल, सावंतवाडी) या विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
इयत्ता चौथी गटात नील नितीन बांदेकर (बांदा जिल्हा परिषद केंद्रशाळा नंबर १), शोर्या भास्कर गावडे (सुधाताई कामत विद्यामंदिर सावंतवाडी ), महेश रुपेश कातळकर (जिल्हा परिषद शाळा, मळगाव ) यांनी प्रथम तीन क्रमांक मिळविले. राजेश्वरी सुनील गवस (जिल्हा परिषद केंद्रशाळा, बांदा नंबर १) व सर्वेक्षा नितीन ढेकळे (जिल्हा परिषद केंद्रशाळा, बांदा नंबर १) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. विजेत्यांना रोख पारितोषिक व शैक्षणिक साहित्य देण्यात आले.
यावेळी बोलताना गुरुनाथ नार्वेकर म्हणाले की, राधारंग फौंडेशनच्या वतीने दरवर्षी शालेय मुलांसाठी शैक्षणिक व विविध कलात्मक उपक्रम राबविण्यात येतात. मुलांचा सर्वांगीण विकास हाच संस्थेचा मुख्य उद्देश आहे. आभार शिक्षक जे डी पाटील यांनी मानले.

You cannot copy content of this page