प्रोत्साहन अनुदान जमा करून शेतकऱ्यांना दिला मदतीचा हात

व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक ः मुख्यमंत्र्यांचे मानले जाहीर आभार

⚡बांदा ता.२०-: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्य नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिवाळी अगोदर 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान देऊन मदतीचा हात दिल्याबद्दल समस्त लाभार्थी शेतकऱ्यांच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जाहीर आभार मानत असल्याचे, पाडलोस सोसायटी व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक यांनी सांगितले.

अनेक महिने रखडलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी आज खऱ्या अर्थाने झाली. यासाठी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी तशी मागणीही केली होती. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रोत्साहन अनुदान देऊन मुख्यमंत्र्यांनी मान राखला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेलेल्याने शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असल्याचे पाडलोस सोसायटी व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक यांनी सांगितले.

You cannot copy content of this page