विलवडे माऊली मंदिरात श्री हरीनाम सप्ताह उद्या

⚡बांदा ता.१९-:  विलवडे येथे  श्री देवी माऊली मंदीरात सालाबातप्रमाणे शुक्रवारी २१ आँक्टोबर रोजी रमा एकादशी मुहूर्तावर सातप्रहाराचा  श्री हरीनाम सप्ताह साजरा होत आहेत.
  
     शुक्रवारी सकाळी १०वा.देवी पालखीचे मंदिरात आगमन,सकाळी १०:३०वाजेपर्यत देवीची पूजा सकाळी ११वा. श्री हरीनाम सप्ताहला सुरवात
सायंकाळी ७ वाजता गावातील महिलाची वारकरी दिंडी कार्यक्रम  रात्रौ ११वा. जागर कार्यक्रम
    शनिवारी पहाटे काकड आरती, सकाळी नामवंत बुवाची भजने
सकाळी ११ नंतर सप्ताहाची सांगता दुपारी १.३० महाप्रसाद
नंतर देवीचा कौलप्रसाद
तरी  सहकुटूंब सहपरीवार मित्रमंडळीसह देवदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन गोपाळ दळवी (कुळकर)व महादेव दळवी (स्थळकर),समस्त गावमर्यादा व ग्रामस्थ व देवस्थान कमिटी यांनी केली आहे.

You cannot copy content of this page