शेर्ले-निगुडे-सोनुर्ली रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 20 रोजी जन आंदोलन

निगुडे सरपंच समीर गावडे यांनी दिले सावंतवाडी उपविभाग महसूल अधिकाऱ्यांना निवेदन

⚡बांदा ता.१८-: निगुडे सरपंच श्री समीर गावडे यांनी उपविभाग अधिकारी (महसूल) सावंतवाडी यांना दि २० ऑक्टोबर २०२२ रोजी जन आंदोलनाचा इशारा दिला आहे.

त्यांनी पत्रात असे म्हटले की शेरले- निगुडे -सोनुर्ली या मुख्य रस्त्यावरून गेले कित्येक दिवस ओव्हरलोड खनिज वाहतूक होत आहे त्यामुळे शेरले- निगुडे- सोनुर्ली हा मुख्य रस्ता पूर्णपणे नादुरुस्त अशा स्थितीत झालेला आहे वारंवार वाहतूक चालक, मालक व खनिज कंपनीला याची कल्पना देऊन सुद्धा संबंधित वाहतूक बंद न केल्यामुळे सदरचा रस्ता पूर्णपणे खचलेला व नादुरुस्त आहे त्यामुळे सदरचा रस्ता हा प्रवासी वाहतूक करण्यास धोकादायक झालेला आहे तसेच सदरील रस्ता प्रजीमा दर्जाचा रस्ता असून बऱ्याच लांबी मध्ये या रस्त्याच्या डांबरी पृष्ठभागाची रुंदी ३.०० मीटर असून रस्त्यावर होणाऱ्या खनिज वाहतुकीमुळे इतर वाहनांना होणारा त्रास व त्याची होणारी हानी व पूल , मोऱ्या खचणे इत्यादी प्रकार घडत आहे सबब मा. उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, सावंतवाडी यांनी आम्ही दिलेल्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक १ यांनी सदर रस्त्याची पाहणी केली असता त्यांच्या लेखी पत्राच्या अनुषंगाने निदर्शनास आले की या रस्त्याच्या साखळी क्रमांक ००/०० ते ५/०० या लांबी मध्ये खनिज वाहतूक सुरू आहे सोनुर्ली, व्यॆक्ते, इन्सुलि या परिसरात सुमारे १३ दगड खाणी सुरू असून त्यामधील खडी वाहतूक गेले वर्षभर सोनुर्ली- निगुडे- शेरले मार्गे रात्रंदिवस ओव्हरलोड डंपर वाहतुकीमुळे ग्रामस्थ, मुले, इंग्रजी स्कूल बसेस, एसटी बसेस, यांना रस्त्यावरून जाताना येताना धोका निर्माण झाला आहे खनिज कंपनीने पर्यायी मार्ग दिला असताना देखील सुद्धा आणि निगुडे गावातून वाहतूक करण्यात येत आहे तसेच वारंवार या संदर्भात जिल्हा खनिकर्म विभाग व उपप्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) यांना कळवून देखील त्याची दखल न घेतल्यामुळे गुरुवार दिनांक २० ऑक्टोबर २०२२ रोजी सोनुर्ली- निगुडे तिठा हा या ठिकाणी सकाळी ठीक ८:०० वाजता सर्व ग्रामस्थांना घेऊन उग्र जनआंदोलन करण्यात येईल त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडल्यास व त्या ठिकाणी कुठचाही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्व जबाबदारी शासन म्हणून आपली राहील याची नोंद घ्यावी व तात्काळ वाहतूक बंद करण्यात यावी तसे न झाल्यास तसेच वाहतूक बंद न झाल्यास आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत तसेच नादुरुस्त शेरले निगुडे सोनुर्ली मुख्य रस्ता जिल्हा खनिकर्म निधीतून लवकरात लवकर म करण्यात यावा यासंदर्भात त्यांनी मा. पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी, आरटीओ, मा. उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, सावंतवाडी, सावंतवाडी तहसीलदार व बांदा पोलीस निरीक्षक व सावंतवाडी पोलीस निरीक्षक मा. गटविकास अधिकारी पंचायत समिती सावंतवाडी आदी सर्वांना लेखी पत्र व्यवहार करण्यात आला आहे ओव्हरलोड डंपर कायमस्वरूपी बंद करण्यात यावे ही त्यांची ग्रामस्थांची प्रमुख मागणी आहे.

You cannot copy content of this page