मडुऱ्यात 21 रोजी मोफत नेत्र तपासणी शिबीर

⚡बांदा ता.१७-: मडुरा माऊली मंदिर येथे शुक्रवार दि.21 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजता संजू परब मित्र मंडळ तर्फे पंचक्रोशी तसेच परिसरातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. लॉरेन्स अँड मेयो कंपनीची उत्कृष्ट दर्जाची चष्मे सवलतीच्या दरात देण्यात येणार आहेत. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजप सावंतवाडी कार्यकारिणी सदस्य बाळू गावडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी बाळू गावडे 94038 81825 यांच्याशी संपर्क साधावा.

You cannot copy content of this page