आचरा येथे बेवारस स्थितीत असलेली मोटरसायकल पोलीसांकडून ताब्यात…

मसुरे मर्ढेवाडी येथून हरवलेली मोटरसायकल असल्याबाबत मसुरे पोलीस स्टेशनकडून दुजोरा

*💫मालवण दि.०२-:* आचरा मालवण रस्त्यावर असलेल्या आशापुरा स्टील सेंटर येथे बेवारस स्थितीत मोटरसायकल ( क्रमांक MH 07 – AK-6810) असल्याची खबर मिळताच आचरा पोलीस स्टेशनचे वाहतूक पोलीस विनायक साटम यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मोटरसायकल ताब्यात घेऊन आचरा पोलीस स्टेशनला बेवारस म्हणून नोंद करण्यात आली आहे. सदर मोटरसायकल सायकल मसुरे येथून हरवलेली मोटरसायकल असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती.या बाबत मसुरे पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार फरांदे यांच्याशी संपर्क साधल्यावर याला दुजोरा मिळाला असून २२जानेवारीला मसुरे मर्ढे वाडी येथील नाझीम नसरुद्दीन शेख यांच्या घरासमोरुन हरवलेली मोटरसायकल असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page