संतोष नानचे, अक्रम खान यांचा हल्लाबोल
*💫सावंतवाडी दि०२-:* बांदा- दोडामार्ग रस्त्याची दुर्दशा व्हायला सत्ताधारी जबाबदार असून गेली दोन वर्षे आम्ही लढा देत आहोत. मात्र, याची दखल न घेणार ठाकरे सरकार, आमदार, खासदार, पालकमंत्री अकार्यक्षम आहेत, असा हल्लाबोळ बांदा सरपंच अक्रम खान, दोडामार्ग माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांनी केला. त्यामुळेच १ मार्चला ‘तिरडी यात्रा’ काढणार असल्याचा रोखठोक इशाराही अक्रम खान व संतोष नानचे यांनी दिला आहे. तर गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर अस मतही त्यांनी यावेळी व्यक्त केल. यावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते संजू परब, मकरंद तोरसकर, बंटी राजपुरोहित आदी उपस्थित होते.
