⚡सावंतवाडी ता.०८-: तालुक्यातील सातार्डा ग्रामपंचायतीच्या वतीने एक तरी झाड लावा हा संकल्प जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सरपंच संदीप उर्फ बाळू प्रभू यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करून करण्यात आला.
पर्यावरणाचे औचित्य साधून झाड आणि पर्यावरणाचे महत्त्व यावेळी सांगण्यात आले पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मानवाने वृक्षतोड थांबवावी. पर्यावरणाचे धरतीवर असलेले ऋणानुबंध कायम ठेवावेत असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सरपंच संदीप उर्फ बाळू प्रभू ग्रामविकास अधिकारी
कुणाल मसगे सदस्य शालिनी राऊळ उपसरपंच विशाखा पारीपत्ये योगेश गोवेकर संतोष गोवेकर
डॉ एमगेकर पोलिस पाटील विनीता मयेकर मनाली पेडणेकर प्रमिला यमगेकर ग्रामसखी स्नेहा पारिपत्ये आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
