एस.पी.के कॉलेजचा एनसीसी कॅडेट साहीश तळणकर सुवर्ण पदकाचा मानकरी…

⚡सावंतवाडी ता.०८-: एनसीसी संचलनालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इंटर ग्रुप शूटिंग चॅम्पियनशिप २०२६ राज्यस्तरीय स्पर्धा नुकतीच छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेत सावंतवाडी च्या एसपीके कॉलेजच्या एनसीसी कॅडेट कु. साहीश दिगंबर तळणकर याने सुवर्ण पदकाचा लक्षवेध केला.
साहीश दिगंबर तळणकर हा मूळ कुडासे दोडामार्ग येथील असून तो सावंतवाडीच्या एसपीके कॉलेजमध्ये प्रथम वर्ष बीएससी मध्ये शिकत असून तो एनसीसीच्या राज्यस्तरीय कॅम्प मध्ये सहभागी झाला होता. त्याची शूटिंगची आवड लक्षात घेता त्याची निवड एनसीसी इंटर ग्रुप शूटिंग चॅम्पियनशिप २०२६ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली होती. त्याने आपली निवड सार्थ ठरवत सदर स्पर्धेमध्ये थ्री पोझिशन ५० मीटर रायफल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत गोल्ड मेडल वर नाव कोरले .
साहीश तळणकर हा उपरकर शुटिंग अकॅडमी सावंतवाडी येथे नियमित सराव करतो. त्याला प्रशिक्षक कांचन उपरकर ( सावंतवाडी) तसेच इंद्रजीत मोहिते (कोल्हापूर) यांचे मार्गदर्शन लाभले .
१९ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान तिरुचिलापल्ली केरळ येथे होणाऱ्या पूर्व राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी साहीशची निवड झाली आहे. या यशाबद्दल सर्व स्तरातून साहीशचे कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page