⚡मालवण ता.०८-:
मालवण तालुक्यातील चिंदर गावातील पायवाटा, रस्ते, गणेश घाट, पार बांधणे आदीसह १४ विकासकामे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी स्वखर्चातून पूर्ण करण्यात आल्याने चिंदर ग्रामस्थांनी आमदार निलेश राणे, दत्ता सामंत यांचे आभार व्यक्त केले आहेत.
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी स्वखर्चातून एकाचवेळी गावातील 14 विकासकामे पुर्ण केली असून यामध्ये लब्देवाडी रस्ता, साटमवाडी रस्ता, कुंभारवाडी स्मशान रस्ता, तेरई मुख्य रस्ता ते ब्राम्हणदेव मंदिर, मुळेघर रस्ता, गावठवाडी (बागवाडी), मुख्य रस्ता ते गावडेपुरुष मंदिर रस्ता यांसह काँक्रिटकरण मध्ये सडेवाडी स्मशान रस्ता, गोसावीवाडी गणेश घाट रस्ता, देवकोंडवाडी, गोसावीवाडी पायवाट (घागरे घर) याठिकाणी काँक्रिटकरण करण्यात आले. तसेच मसूरकरवाडी महापुरुष पार बांधणे, पाटणकर वाडी येथील रस्त्यावर अडथळा ठरणारा वीज खांब एका दिवसात बाजूला करून दिला. यासोबत सडेवाडी स्मशान चौथरा उभारणी यांचा समावेश आहे या सर्व कामांची शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले
यावेळी शिवसेना विभाग प्रमुख संतोष कोदे, मंगेश गांवकर, भाऊ हडकर, मनोज हडकर, सुनील लब्दे, रोहन गांवकर यांसह प्रत्येक वाडीतील ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.
