कोकणच नाव नाथ पै व राणे यांनीच मोठ केले

आमदार शहाजी बापू पाटील : राणेंमुळेच विशाल परब यांची उंची वाढली

कुडाळ ता.१५-: कोकणच नाव ज्यांनी मोठ केले ते म्हणजे बॅरिस्टर नाथ पै व नारायण राणे या दोन व्यक्तींनी असे प्रतिपादन बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी केले. ते विशाल परब वाढदिवसानिमित्त बोलत होते.

दरम्यान नारायण राणे यांनी संघर्ष केला त्यामुळे शिवसेना वाढवण्यात राणे यांचा मोठा हात असल्याचे ते म्हणाले.
विशाल परब आयुष्यात यशस्वी झाले ते म्हणजे तरुणांचे प्रेम व निलेश राणेंची साथ यामुळेच. राणे यांमुळेच विशाल परब आज इतक्या उंचीपर्यंत पोहचले असेही आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले.

तसेच ते बोलताना पुढे म्हणाले की निलेश राणे पुढच्या वेळी तुम्ही खासदारकीसाठी उभे रहा, तुमच्या विजयाची जबाबदारी मी स्वीकारेन, कोकणात आम्ही धुरळा पाडू, तुम्ही भविष्यात पुन्हा खासदार होणारच, असा विश्वास सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी आज येथे व्यक्त केला. दरम्यान शिवसेनेतील दोन राऊतांवर माझा मोठा राग आहे. या दोघांनी आमचं वाटोळं केलंय, त्यामुळे “काय बी झालं तरी त्यांना सोडणार नाही”. एकाला पाडण्याची संधी तुमच्या मुळे मला नक्कीच मिळेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. पाटील बोलत होते.

You cannot copy content of this page