देवगड बंदर लवकरच पूर्ण होईल

किरण सामंत यांचे मच्छीमारांना आश्वासन

देवगड-प्रतिनिधी
देवगड येथील बंदर प्रकल्पाचे काम अर्धवट अवस्थेमध्ये असून ते लवकरात लवकर सुरु करावे असे विविध मच्छिमारांच्या समस्यांच्या प्रश्नांचे निवेदन देवगड येथे आलेल्या उदयोजक व शिंदे गटाचे नेते किरण सामंत यांच्याकडे देवगड मच्छिमार बांधवांनी दिले आहे.


यावेळी तारामुंबरी मच्छिमारी सहकारी सोसायटी चेअरमन विनायक प्रभू,देवगड फिशरमनचे चेअरमन दिग्वीजय कोयंडे, दत्तप्रसाद भिल्लारे,उमेश आंबेरकर,उमेश खवळे,देविदास कुबल,बाबी तेली,प्रसाद कांदळगावकर,सुनिल सावंत,बाळा कोयंडे आदी उपस्थित होते.
या निवेदनामध्ये असे नमुद केले आहे की, देवगड येथे उभारण्यात आलेल्या देवगड आनंदवाडी बंदर प्रकल्पाचे काम अर्धवट स्थितीमध्ये असून सदर प्रकल्पाचे काम पुन्हा चालु होऊन ते पुर्णत्वास करण्यात यावे, अर्धवट कामामुळे समुद्रामध्ये जाण्यासाठी मच्छिमारांना अडचण निर्माण होत आहे. तसेच सदरच्या प्रकल्पामुळे मोठी आर्थीक उलाढाल देखील होणार आहे. यामुळे सदरचा प्रकल्प लवकरात लवकर पुर्ण करण्यात यावा. तसेच 120 एच पी पेक्षा क्षमतेच्या इंजिन असलेल्या मासेमारी बोटींना 2022 2023 च्या डिझेल कोटयामध्ये शासनाने समावेश केलेला नाही यामुळे अश्या नौकांना बोटींना मासेमारी करता येत नाही. तसेच मंजुर झालेला डिझेल कर परतावा या नौकांना शासन देत नाही तरी वरील नौकांना डिझेल कोटा मंजुर करावा व त्यांचा स्थिगित ठेवण्यात आलेला डिझेल कर परतावा त्यांना आदा करण्यात यावा अश्या मागणीचे निवेदन देवगड मच्छिमार बांधवांनी शिंदे गटाचे नेते किरण सामंत यांच्याकडे देण्यात आले.
फोटो- शिंदे गटाचे नेते किरण सामंत यांच्याकडे निवेदन सादर करताना देवगड तालुका तारामुंबरी मच्छिमार सहकारी सेवा सोसायटीचे पदाधिकारी व मच्छिमार बांधव आदी छाया-वैभव केळकर

You cannot copy content of this page