⚡मालवण ता.१५-:
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर या संस्थेची २०२२- २४ या वर्षासाठी पर्यावरण समिती गठीत करण्यात आली असून यामध्ये सदस्य म्हणून मालवण मधील श्री. लक्ष्मीकांत खोबरेकर यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी खोबरेकर यांना पाठविले आहे.
बांधकाम व्यवसायात कार्यरत असणारे लक्ष्मीकांत खोबरेकर हे मालवण मधील बॅ. नाथ पै सेवांगण या संस्थेसह इतर विविध सामाजिक व पर्यावरण विषयक संस्थांवर काम करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन चेंबर ऑफ कॉमर्सचे पर्यावरण समितीवर सदस्य म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. याबद्दल त्यांचे मालवणमधून अभिनंदन होत आहे.
