२३ रोजी खुल्या नरकासुर स्पर्धेचे आयोजन

आमची वाडी देऊळवाडी मित्रमंडळाचे आयोजन

बांदा /प्रतिनिधी
येथील आमचीवाडी देऊळवाडी मित्रमंडळ बांदा यांच्या वतीने नरक चतुर्दशी निमित्त रविवार दिनांक २३ ऑक्टोबर रोजी भव्य खुल्या नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
रात्री ८ ते १० वाजता ही स्पर्धा श्री देव बांदेश्वर मंदिर जवळ संपन्न होणार आहे. स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे १००००, ५०००, २००० रुपये रोख व चतुर्थी व पाचव्या क्रमांक विजेत्यांना प्रत्येकी १००० रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. ही स्पर्धा विनामूल्य असून अधिक माहितीसाठी गुरुनाथ साळगावकर (मो. ८९५६९८३५४४) किंवा आशिष सावंत (मो. ७०५८३२२७०६) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page