संदिप मेस्त्री मित्रमंडळाचा पुढाकार.
⚡कणकवली ता.१५-: दिवाळी निमित्त सालाबाद प्रमाणे यावर्षीही संदिप मेस्त्री मित्र मंडळाच्यावतीने विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे, नरकासुर स्पर्धा, व महिलांसाठी आंगन रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून जास्तीत जास्त कलमठ वासियानी यात सहभाग दर्शवावा असे आवाहन संदीप मेस्त्री यांनी केले आहे.
नरकासुर स्पर्धेसाठी आबा कोरगावकर, परेश कांबळी यांच्याशी संपर्क साधावा. स्पर्धेसाठी विविध प्रकारची बक्षिसे ठेवण्यात आली असून
प्रथम ४०००- सन्मानचिन्ह, द्वितीय ३०००-सन्मानचिन्ह, तृतीय २०००-सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ १०००-सन्मानचिन्ह
आंगन रांगोळी स्पर्धेसाठी
समीर कवठणकर विराज मेस्त्री यांच्याशी संपर्क साधावा
बक्षीसे प्रथम १५००-सन्मानचिन्ह
द्वितीय,१०००-सन्मानचिन्ह,
तृतीय ७००-सन्मानचिन्ह
उत्तेजनार्थ ५००-सन्मानचिन्ह तसेच सहभागी ना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे
