मोबाईल,इंटरनेट पेक्षा पुस्तक वाचनाला वेळ द्या

डी.पी.तानवडे ;नगरवाचनालयातर्फे वाचन प्रेरणा दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शन

⚡कणकवली ता.१५-: भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दूल कलाम यांचे जीवनसंघर्ष प्रत्येक विद्यार्थ्यांनी वाचला पाहिजे.त्यांचा
जीवनसंघर्ष वाचल्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळून तुमच्या आयुष्याची जडणघडण चांगली होईल. तसेच विद्यार्थ्यांनी मोबाईल व इंटरनेटवर वेळ घालविण्यापेक्षा काही वेळ पुस्तके वाचण्यासाठी द्यावा, असे आवाहन नगरवाचनालयाचे सहकार्यवाह डी. पी. तानवडे यांनी केले.


कणकवली नगरवाचनालयातर्फे वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नगरवाचनालयाचे कार्यवाह हनीफ पिरखान,वैजयंती करंदीकर यांच्यासह वाचनालयाचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व सजावून सांगितले. भारताचे राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवस हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त नगरवाचनालयात पुस्तक व ग्रंथांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. हे प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थी,वाचकांनी गर्दी केली होती.

You cannot copy content of this page