सरस्वती हायस्कूल नांदगाव येथे वाचन प्रेरणा दिन व हात धुवा दिन

⚡नांदगाव ता.१५-: भारतरत्न डाॅ.ए.पि.जे.अब्दुल कलाम यांचा जयंती दिन वाचन प्रेरणा दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येत आहे.या दिनाचे औचित्य साधून नांदगाव हायस्कूल मध्ये सर्व विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व शिक्षकांनी पुन्हा एकदा अधोरेखित करुन सांगितले.घरोघरी वर्तमान पत्रांचे वितरण करणारा विद्यार्थी पुढे जाऊन आपल्या अथक परिश्रमाने जागतिक दर्जाचा मिसाईल मॅन बनतो एवढेच नव्हे तर भारताचा राष्ट्रपती बनून देशाची सेवा करतो हे विद्यार्थ्यांना प्रेरणा घेण्यासाठी उत्तम उदाहरण असल्याचे नमूद केले.त्यांच्या अभ्यासू वृत्तिपासून प्रेरणा घेउन तुम्ही विद्यार्थ्यांनी देशाचे नाव उज्जवल करण्याचे आवाहन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.तांबे एस.बी.यांनी केले.याप्रसंगी प्रशालेलील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखिल मुलांना मार्गदर्शन केले.
शाळेच्या ग्रथालयातील विविध पुस्तके मुलांना वितरीत केली.काही विद्यार्थ्यांनी पुस्तकांचे प्रकट वाचन केले.
आजच जागतिक हात धुवा दिन असल्याने मुलांना विविध आजारापासून संरक्षण मिळवण्यासाठी साबण लावून हात धुण्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांकडून करुन घेतले.दोन्ही कार्यक्रम अतिशय उत्साहाच्या वातावरणात साजरे केले गेले.संस्थाध्यक्ष नागेश मोरये यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page