⚡सावंतवाडी ता.१५सहदेव राऊळ- : भारताचे थोर शास्त्रज्ञ तथा माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त आरोस येथील आरोस पंचक्रोशी विद्याविकास हायस्कूल येथे जागतिक वाचन व हात धुवा दिन साजरा करण्यात आला.
भारताचे थोर शास्त्रज्ञ तथा माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त देशात सर्वत्र वाचन प्रेरणा व हात धुवा दिन साजरा करण्यात येत आहे. आरोस येथील आरोस पंचक्रोशी हायस्कूल येथे हा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
मुख्याध्यापक विद्याधर देसाई यांनी डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी शिक्षक अनिल नाईक, तानाजी वरक, चव्हाण मॅडम, एल. के. सावंत सर ,मांजरेकर मॅडम, परब मॅडम,मुळीक मॅडम, लिपिक तानाजी खोत, शिक्षकेतर कर्मचारी लक्ष्मण शेळके ,विद्यार्थी ,पालक आदी उपस्थित होते. यावेळी मुलांनी प्रत्यक्ष पुस्तक वाचन केले. त्यानंतर हात धुवा दिन साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त शाळेतील शिक्षक अनिल नाईक, तानाजी वरक यांनी मुलांना हात धुण्याबाबत प्रात्यक्षिक दाखवून मुलांना स्वच्छतेची माहिती दिली.
