कॉन्स्टेबल प्रमोद काळसेकर यांनी पुन्हा घडवले माणुसकीचे दर्शन

*बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या महिलेला ग्रामीण रुग्णालयात केले दाखल*

*💫वेंगुर्ले दि.०२-:* वडखोल येथील सुरेखा गणेश गिरी ( वय ६३ वर्ष) रा. गिरीमठ ही महिला बाजारात फिरून हिरवे काजूगर विक्री करून आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती. आज अशाच प्रकारे काजू विक्री करत असताना १०:४५ वाजण्याच्या सुमारास वेंगुर्ला येथील मारुती मंदिर जवळ चक्कर येऊन बेशुद्ध होऊन पडली असता. आज रजेवर असलेले कॉन्स्टेबल प्रमोद काळसेकर यांनी त्या महिलेस स्वतः त्या ठिकाणी जाऊन रिक्षेतून त्या महिलेस ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. ते आज बाजारपेठेत आले असताना माणुसकीचे दर्शन पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. सद्या ते सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्यामुळे सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page