विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा दौऱ्यावर असताना दिली सावंतवाडीला भेट
⚡सावंतवाडी ता.१५-: शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील हे आज भाजप युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांनी सावंतवाडीला भेट दिली. यावेळी सावंतवाडी गवळी तिठा येथे भाजपचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आहे. यावेळी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यानी देखील त्यांचे स्वागत केले.

श्री पाटील हे आता विशाल परब यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त कुडाळ येथे रवाना होणार असून ते सायंकाळी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
यावेळी भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे,माजी जेष्ठ उपनगराध्यक्ष राजू बेग, ज्येष्ठ माजी जेष्ठ नगराध्यक्ष अनोरोजीन लोबो माजी नगरसेविका दिपाली भालेकर, माजी नगरसेवक आनंद नेगवी, बंटी पुरोहित,विनोद सावंत,दिलीप भालेकर,अमित परब,अजय सावंत, अनिल सावंत,पिंट्या सावंत, केतन आजगावकर सत्यवान बांदेकर, शोक दळवी, भावू नाटेकर, बबन राणे, महेश पांचाळ,राज वेरकर,गुरू सावंत, जितू गावकर,आदी उपस्थित होते.
