भोम पुनर्वसन येथील घरांत घुसले पाणी
वैभववाडी प्रतिनिधी
वैभववाडी तालुक्यात वीजांच्या कडकडासह परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. शुक्रवारी दुपारनंतर वैभववाडी तालुक्यात वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. मांगवली पुनर्वसन गावठाण परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसाने भोम पुनर्वसन गावठाण बौध्दवाडी येथील पाच घरात पाणी शिरल्यामुळे त्यांचे नुकसान झाले आहे. तर घराभोवती लावलेली झाडे मोडून नुकसान झाले आहे.तर कोकिसरे येथे पाण्याची टाकी व शौचालय कोसळून ५० हजाराचे नुकसान झाले आहे .तर वाभवे तांबेवाडी येथे घरावर वीज पडल्यामुळे घरातील मिटरसह वायरिंग जळून १० हजार रुपयांचे नुकसान झाले अहे. वीजांच्या कडकडाटामुळे तालुक्यातील अनेक घरातील वीज उपकरणे निकामी झाली आहेत. तर वैभववाडी पोलिस ठाणे येथील विदयुत उपकरणे नादुरुस्त झाली आहे.
तालुक्यात गेले चार पाच दिवस परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. दररोज दुपारनंतर वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. शुक्रवारी दुपारनंतर वीजांच्या कडकडाटास मुसळधार पाऊस झाला. मांगवली पुनर्वसन गावठाण परिसरात तर ढग फुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसाने भोम बौध्दवाडी पुनर्वसन गावठाणातील बाळकृष्ण सोनू कांबळे, चंद्रकांत कांबळे, मारुती कांबळे, अनिल कांबळे , अभय कांबळे यांच्या घराशेजारी असलेल्या ओढ्याचे पाणी घुसल्यामुळे नुकसान झाले आहे. तर घराशेजारी लावलेली झाडे व भात शेतीत पाणी घुसल्यामुळे झाडे व भात शेतीचेही नुकसान झाले आहे.
या पावसाने कोकिसरे येथील शौचालय रमेश शिंगरे यांची पाण्याची टाकी व शौचालय कोसळल्यामुळे ५०.हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तर वाभवे तांबेवाडी शिवराम नारायण तांबे यांच्या घरातील वीज मिटर व वायरिंग जळून १०.हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
या पावसामुळे भात शेती आडवी होऊन मोठे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे वीजांमुळे घरातील वीज उपकरणे निकामी झाली आहेत. राञीपर्यंत वीज पुरवठा खंडीत होता.
