बौद्धाचार्य जयवंत मोरे
⚡वैभववाडी ता.१४-: डाॕ.बाबासाहेबांना शिक्षणात अग्रेसर, सुसंस्कृत स्वतःच्या पायावर उभा असलेला नवसमाज निर्माण करायचा होता. त्यांना अभिप्रेत असलेला नवसामाज निर्मितीसाठी त्यांचे विचार समजून घेऊन त्याप्रमाणे आचारण केले पाहीजे. असे प्रतिपादन बौध्दाचार्य जयवंत मोरे ( राजापूर) यांनी केले.
वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघ व माता रमाई महिला मंडळ यांच्या संयुक्तविदयमाने ६६.वा धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमाचे आयोजन डाॕ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मोरे बोलत होते. यावेळी विचारमंचावर संघाचे अध्यक्ष भास्कर जाधव, महिला मंडळ अध्यक्षा शारदा कांबळे, कार्याध्यक्षा मोहीनी कांबळे, संस्कार समिती अध्यक्ष संतोष कदम आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मोरे यांनी डाॕ.बाबासाहेबांचे अर्थ विषयक धोरण स्पष्ट करीत समाजाने शिक्षण घेऊन रोजगारधांदयाच्या माध्यमातून आर्थिक सक्षम झाले पाहीजे. अनावश्यक खर्च टाळून आपली गुंतवणूक ही शिक्षणात केली पाहीजे असे सांगितले.
यावेळी आर्दश शिक्षक पुरस्कार प्राप्त संतोष कदम व प्रफुल्ल जाधव, जयवंत मोरे यांचा पुष्पगुच्छ, शाल देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे तालुक्यातील सभासदांच्या गुणवंत विदयार्थ्यांना प्रमाणपत्र व पुस्तक भेट देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात स्मारकातील डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला रविंद्र पवार व मारुती कांबळे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर सभागृहातील भगवान गौतमबुध्द व डाॕ.आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांचे हस्ते पुष्पहार व दिपप्रज्वलन करुन उद्दघाटन करण्यात आले. संघाचे बौध्दाचार्य महेंद्र यादव, मंगेश कांबळे, अभय कांबळे यांनी विधीसंचलन केले. यावेळी संतोष कदम, शारदा कांबळे, भास्कर जाधव यांनी मनोगत व्यक्त करीत धम्म बांधवांना शुभेच्छा दिल्या. प्रास्तविक रविंद्र पवार तर सूञसंचलन व आभार शरद कांबळे यांनी मानले. यावेळी संजय जंगम, राजेंद्र पवार, धोंडीराम तांबे, विश्वास पेडणेकर, यांच्यासह मोठ्यासंख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
