Headlines

कसाल येथील काजरोबा मंदिराची मंदिराची फंड पेटी अज्ञाताने फोडली

मालवण – कसाल राज्य मार्गावरील कसाल हुमरणेवाडी येथील रस्त्या नजिक असलेल्या श्री देव काजारोबा मंदिराची दानपेटी अज्ञात चोरट्याने गुरुवारी रात्री फोडल्याचा प्रकार घडला आहे. पेटीतील एक हजार रुपयांवर त्या चोरट्याने डल्ला मारत पोबारा केला आहे. याबाबत येथील विनोद चंद्रकांत परब यांनी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.


तक्रारदार परब यांनी दिलेल्या फिर्यादीत गुरुवारी रात्री ८ ते शुक्रवारी सकाळी ६.३० या वेळेत ही चोरी अज्ञात चोरट्याने केली आहे. फंड पेटी फोडत चोरट्याने नोट व नाणी मिळून असलेले एक हजार रुपये लंपास केले आहेत. घटनास्थळी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत देवरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भेट दिली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटिव्ही तपासले असून परिसरात राहणाऱ्या परप्रांतीय नागरिकांची चौकशी सुरू केली आहे.

You cannot copy content of this page