कट्टा येथे २७ पासून हरिनाम सप्ताह

⚡मालवण ता.१४-: कट्टा बाजारपेठेतील विठ्ठल-रखुमाई व लक्ष्मीनारायण मंदिरातील हरिनाम सप्ताह २७ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत साजरा होणार आहे. यानिमित्त श्रींची पालखी . मिरवणूक निघणार आहे.

कट्टा बाजारपेठेतून या हरिनाम सप्ताहासाठी सात पार पाडण्यात आले आहेत. यानिमित्त रोज प्रसिद्ध भजनी मंडळांची भजने, दिंड्या, चित्ररथ असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ४ रोजी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रम, ७ रोजी दीपोत्सव आदी कार्यक्रम होणार आहेत. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन व्यवस्थापन कमिटीने केले आहे.

You cannot copy content of this page