नाथ पै एकांकिका स्पर्धा
24 डिसेंबरपासून सुरू

⚡कणकवली ता.१४-: प्रतिवर्षीप्रमाणे २४ डिसेंबर रोजी सुरू होणारी वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानची ‘नाथ पै एकांकिका स्पर्धा’ संस्थेने जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील प्रथितयश पहिल्या तीन स्पर्धांमध्ये या स्पर्धेची गणती होत असून सर्वात जुनी असलेली ही स्पर्धा सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करीत आहे. हे स्पर्धेचे ४५ वे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे ही स्पर्धा २४ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२२ या कालावधीत संपन्न होणार आहे.

या स्पर्धेत खुल्या गटासाठी अनुक्रमे ₹३०,०००,₹१५,००० व ₹१०,००० तर शालेय गटासाठी ₹१०,०००, ₹७,५०० व ₹५,००० अशी सांघिक रोख पारितोषिके, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येते तर अभिनय स्त्री-पुरुष, दिग्दर्शन, नेपथ्य यासाठीही रोख पारितोषिके, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र स्वतंत्रपणे देण्यात येतील. स्पर्धेत एकूण १,२५,००० रकमेची रोख पारितोषिके दिली जाणार आहेत.

नाथ पै एकांकिका स्पर्धा कणकवली येथे दिनांक २४ डिसेंबर ते २८ • डिसेंबर २०२२ या कालावधीत संस्थेच्या नाट्यगृहात घेतली जाईल. दि. २४ व २५ डिसेंबर २०२२ रोजी शालेय गट, तर दि. २६, २७ व २८ डिसेंबर २०२२ रोजी खुला गट अशा दोन गटात स्पर्धा संपन्न होईल. या स्पर्धेत शालेय गटात कमाल १० तर खुल्या गटात कमाल १५ प्रथम येणाऱ्या एकांकिकांनाच प्रवेश देण्यात येईल. स्पर्धेची प्रवेश फी शालेय गटासाठी ₹५००/- तर खुल्या गटासाठी ₹१०००/- एवढी आहे. स्पर्धेचा प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ५ डिसेंबर २०२२ पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी संस्थेचे कार्यवाह श्री शरद सावंत यांच्या ९४२२५८४०५४ या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष अॅड. एन. आर. देसाई यांनी केले आहे.

You cannot copy content of this page