स्वच्छता अभियानामध्ये जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायतीनी सहभाग घ्यावा

सीईओ प्रजित नायर यांचे आवाहन

⚡ओरोस ता.१४-: ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्यमान, जीवनस्तर उंचावण्यांसाठी राज्य शासनाकडून विविध अभियान राबविण्यांत येतात. परिसर स्वच्छता आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागातून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुन्हा अधिक जोमाने राबविण्यांत येणार असून 11 ऑक्टोबर पासूनच या अभियानाला सुरुवात झाली आहे. 15 नोव्हेंबर पर्यंत हे अभियान राबविण्यांत येणार आहे. या अभियानांत जिल्ह्याती सर्व ग्रामपंचायतीनी सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे.

गावागावात निर्माण होणाऱ्या स्वच्छतेच्या नव्या सुविधा, नागरिकांचे स्वच्छतेबाबतीत होणारे मत परिवर्तन व स्वच्छतेच्या चळवळीत ग्रामीण भागातील सर्व ग्रामस्थांचा सक्रिय व सातत्यपूर्ण सहभाग घेणे हे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचे वैशिष्ट आहे. राज्यातील ग्रामपंचायती, तालुके व जिल्हयांत स्वच्छतेच्या विविध पैलूतील प्रगतीबाबत एक सर्वसमावेशक स्पर्धा राबवून त्याच्या माध्यमातून ग्रामस्थांना प्रोत्साहित करुन स्वच्छतेच्या कार्यक्रमाचा आपलेपणा व महत्त्व पटवून देण्याकरिता, राज्यांत संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यांत येत आहे, असे नायर यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाच्या माध्यमातुन महाराष्ट्रात स्वच्छतेचा जागर निर्माण करणे. ग्रामपंचायतीत समाविष्ट गावांतील वैयक्तिक शौचालये, त्यांचा वापर, हागणदारीमुक्त तपासणीचा अहवाल त्यानुषंगाने दुरुस्त करावयाची शौचालये, एक खडडा ते दोन खडडा करावयाची शौचालये, गावे हागणदारीमुक्त म्हणून घोषित करण्यांकरिता करावयाची कार्यवाही व पूर्तता याबाबत ठोस कृती कार्यक्रम आखून 15 नोव्हेंबरपर्यंत ही कार्यवाही करावयांची आहे. स्वच्छतेच्या या महायज्ञात नागरिक, कर्मचारी, अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी सक्रिय सहभाग देवून, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात भाग घ्यावा असे आवाहत नायर व उप मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page