उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यांची माहिती
⚡ओरोस ता.१४-: जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या माध्यमातुन जिल्ह्यातील एकुण 5656 पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोत्राचे 3705 महिलाच्या माध्यमातुन एफटिके किटच्या सहाय्याने पाण्याची तपासणी होणार आहे. अशी माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यांनी दिली.
केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन या महत्वकांक्षी प्रकल्पातर्गत पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमामध्ये ग्रामीण भागातील जनत़ेला शुध्द व सुरक्षित पाणी उपलब्ध करून देणे हे शासनाचे प्रमुख उदिष्ट आहे. यासाठी पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेची तपासणीसाठी क्षेत्रीय तपासणी संचाच्या (फिल्ड टेस्ट किटच्या) माध्यमातून स्थानिक लोकांना सक्षम आणि पाणी गुणवत्ताबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
ग्रामपंचायत स्तरावर गावनिहाय पाणी गुणवत्ता तपासणी करिता महसुल गाव निहाय पाच महिलांना जैविक फिल्ड टेस्ट किट H2S व्हायलसबाबत प्रशिक्षण देण्यात आले होते. या प्रशिक्षित महिलाच्या माध्यमातुन जिल्ह्यातील 5656 पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताची तपासणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील 5656 सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे जैविक एफ टी के – एच २ एस व्हायलस (बाटली) वापरुन तपासणी करण्याकरीता लागणा-या एफ टी के – एच २ एस व्हायलस (बाटली) जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग च्या माध्यमातुन पुरविण्यात आल्या आहेत. तपासणी केलेल्या जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या सर्व स्त्रोताचे निष्कर्ष केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर नोंदविला जाणार आहे.
जिल्ह्यात जलजन्य आजार होऊ नयेत. तसेच पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता उच्च प्रतिची राखली जावी तसेच पाणी गुणवत्ता कार्यक्रम महिलांना आपलासा वाटावा हा हेतु शासनाचा आहे. या करीता प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान मोडवर या कार्यक्रमाचे आयोजन जिल्ह्यात करण्यात आले आहे, अशी माहिती ठाकूर यांनी दिली आहे.
