कोलगाव येथील १६ वर्षीय युवक बेपत्ता…

⚡सावंतवाडी ता.१३-: कोलगाव येथील राहत्या घरातून कोणालाही न सांगता आकाश प्रकाश अक्का तंगेरहाळ (वय १६) हा मुलगा दिनांक ११ ऑक्टोंबर रोजी रात्री निघून गेला असून, तो अद्याप घरी न आल्याने त्याबाबत अपहरणाचा गुन्हा सावंतवाडी पोलिस स्थानकात आज दाखल करण्यात आला आहे.

यावेळी या मुलाबाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास किंवा सबंधित मुलगा कुठे दिसून आल्यास पोलिस स्थानकात संपर्क साधावा असे आवाहन सावंतवाडी पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी केले आहे. यावेळी त्यांनी 02363-272260, 02363-272066, या क्रमांकावर किंवा पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे 7020163483, सहायक पोलिस निरीक्षक सय्यद 7506284993 यांना संपर्क करावा असे आवाहन केले आहे.

You cannot copy content of this page