असरोंडी नं.१ शाळेच्या प्राप्ती चिंदरकर यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान

⚡कणकवली ता.१३-: कै. सौ. चंद्रभागाबाई भिका कंखरे बहुउद्देशिय संस्था, शिरपूर व महाले प्रतिष्ठाण, धुळे यांच्यावतीने राज्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला शिक्षिकांना दरवर्षी गौरविण्यात येते . या पुरस्कारासाठी एका जिल्ह्यातून एका महिला शिक्षिकेची निवड करण्यात येते . राज्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला शिक्षिकांना गौरविण्यात येते .

यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असरोंडी नं.१ येथे कार्यरत असलेल्या शिक्षिका सौ. प्राप्ती भगिरथ चिंदरकर यांना त्यांच्या शैक्षणिक , सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला आहे . ९ ऑक्टोबर रोजी शिरपूर, धुळे येथे हा कार्यक्रम संपन्न झाला असून या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून
नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल व आम.काशिरामजी पावरा हे उपस्थित होते.
सौ.प्राप्ती भगिरथ चिंदरकर या विद्यार्थीप्रिय व उपक्रमशील शिक्षिका असून शैक्षणिक , सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने नाविन्याचा तथा विद्यार्थी विकासात्मक दृष्टीकोन ठेवून कार्यरत असतात . सौ. प्राप्ती भगिरथ चिंदरकर यांना प्राप्त झालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व क्षेत्रातून कौतुक होत आहे .

You cannot copy content of this page