वेंगुर्ला येथे ४ फेब्रुवारी रोजी महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर…

*💫वेंगुर्ले दि.०२-:* आधार फाऊंडेशन, सिंधुदुर्ग, कर्मसिंधु प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग व वेंगुर्ला गॅस सर्व्हिस – वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच एसएसपीएम हॉस्पिटल-पडवे व जिल्हा सामान्य रुग्णालय- ओरोस यांच्या सहकार्याने फक्त महिलांसाठी ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वा.ते दुपारी १२:३० वा.पर्यंत ग्रामीण रुग्णालय वेंगुर्ला येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. कै. प्रा. मेघ:श्याम दाजी वेंगुर्लेकर यांच्या २१ व्या स्मृतिदिनानिमित्त तसेच संरक्षण क्षमता महोत्सव (सक्षम २०२१ अंतर्गत) फक्त महिलांसाठी हे मोफत आरोग्य तपासणी शिबीर असून सदर शिबिरामध्ये एसएसपीएम हॉस्पिटल पडवे येथील कर्करोगतज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, नाक – कान – घसा तज्ञ, तसेच जिल्हा रुग्णालय, ओरोस येथील अस्थिरोगतज्ञ, सामान्य औषध, जनरल सर्जरी, आहारतज्ञ, त्वचारोग तज्ञ आदी डॉक्टर्स उपस्थित राहणार आहेत. सदर शिबिरामध्ये रक्तगट तपासणी व इतर आवश्यक चाचण्या मोफत करण्यात येणार आहेत.तरी तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी सदर शिबिराचा लाभ घ्यावा.अधिक माहिती तसेच नाव नोंदणीकरिता (०२३६६-२६२१०५ / २६३१०५) येथे संपर्क साधावा, असे आवाहन आधार फाऊंडेशन, सिंधुदुर्ग च्या अध्यक्षा माधुरी मेघ:श्याम वेंगुर्लेकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page