भाजपची शहर महिला कार्यकारणी जाहीर

*महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे यांच्या अध्यक्षतेखाली शहर अध्यक्ष मोहिनी मडगावकर यांनी केली कार्यकारणी जाहीर

*💫सावंतवाडी दि.०२-:* सावंतवाडी येथे महिला शहर मंडलची बैठक काल महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे. यावेळी महिला शहर अध्यक्ष मोहिनी मडगावकर यांनी महिला शहर कार्यकारणी जाहीर केली आहे. यावेळी महिला सरचिटणीस पदी मेघना साळगावकर, ज्योती पाटणकर, उपाध्यक्ष अँड सुप्रिया केसरकर, मिसबा शेख, अँड पुजा जाधव, ज्योती मुद्राळे, चिटणीस निर्मला यादव, श्रद्धा नाईक, अदिती दळवी, निमंत्रित सदस्य परिणीती वर्तक, आणि सोशल मीडिया प्रमुख पदी दीप्ती माठेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर बूथ अध्यक्ष म्हणून प्राजक्ता मुद्राळे, साक्षी गवस, बेला पिंटो, अस्मिता भराडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा चिटणीस रेखा काणेकर, कुडाळ तालुका चिटणीस रेवती राणे, सावंतवाडी नगरसेविका दिपाली भालेकर, उत्कर्षा सासोलकर, समृध्दी विरनोडकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page