*💫बांदा दि.०२-:* बांदा सरपंच अक्रम खान व मकरंद तोरसकर मित्र मंडळातर्फे गडगेवाडी प्रीमियर लीग (GPL2021) सीझन 4 चे आयोजन करण्यात आले आहे. बांदा भरड मैदान येथे ५ ते ७ फेब्रुवारी दरम्यान हि भव्य क्रिकेट स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत बांदा शहरातील खेळाडू असलेले 8 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 31 हजार 111 रुपये व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक 21 हजार 111 व आकर्षक चषक ,तृतीय व चतुर्थ साठी 7 हजार 777 आकर्षक चषक ठेवण्यात आले आहे. त्याशिवाय मालिकावीर, उत्कृष्ट गोलंदाज, प्रत्येक सामन्यात सामनावीर अशी आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. या क्रिकेट सामन्याचा लाभ दर्शकानी घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
सरपंच अंक्रम खान आणि मकरंद तोरसकर मित्रमंडळाच्या वतीने गडगेवाडी प्रीमियम लीगचे आयोजन…
