तारामुंबरी येथील महिलेचा पाण्यात बुडून मृत्यु….

*💫देवगड दि.०१-:* मुळे काढण्यासाठी गेलेल्या तारामुंबरी येथील महिलेचा पाण्याचा अंदाज न आल्याने खाडीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यु झाला.भाग्यश्री नथुराम धुरत(४५) असे या महिलेचे नाव असून ही घटना सोमवारी सकाळी ७.३० वा सुमारास तारामुंबरी खाडीपात्रात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, तारामुंबरी मंदीरवाडा येथील भाग्यश्री नथूराम धुरत(४५) ही महिला नेहमीप्रमाणे सोमवारीही सकाळी ७.३० वा.सुमारास तारामुंबरी खाडीपात्रात मुळे काढण्यासाठी जात होती.याचदरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने खाडीच्या पाण्यात बुडून तिचा मृत्यु झाला.काही वेळाने खाडीच्या पाण्यात तिचा मृतदेह तरंगत असताना दिसला.याबाबत तिचे पती नथुराम कृष्णा धुरत यांनी देवगड पोलिस स्थानकात खबर दिली.पोलिसांनी आकस्मिक मृत्यु म्हणून नोंद केली आहे.तपास महिला पोलिसा हवालदार वनिता पडवळ करीत आहेत.

You cannot copy content of this page