*मारहाण व शिविगाळ प्रकरणी संशयिताचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायलयाने फेटाळला*

सिंधूदुर्गनगरी १-: मारहाण व शिवीगाळ प्रकरणातील संशयित आरोपी सुधीर व्यंकटेश खोत (44) रा. काळसे बागवाडी याचा अटकपूर्व जामीन अर्ज येथील जिल्हा न्यायाधीश दोन व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर बी रोटे यांनी फेटाळून लावला आहे. सरकार पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील रुपेश देसाई यांनी काम पाहिले. 14 जानेवारी रोजी काळसे बागवाडी येथील अमृत नार्वेकर, प्रशांत मिठबावकर व अन्य एक असे मालवण तहसीलदार कार्यालयाकडे जात असताना प्रशांत मिठबावकर यांना एका मित्राने धामापूर परबवाडी येथे बस स्टॉप जवळ अपघात झाला असून या ठिकाणी जाण्यास सांगितले होते. ईरटीका कार आणि टेम्पो ट्रॅव्हलर या दोन वाहनांच्या चालकांमध्ये आरसा घासल्या वरून बातचीत सुरू होती. त्या ठिकाणी सुधीर आणि मदत खोत उपस्थित होते. सुधीर याने टेम्पो ट्रॅव्हलरच्या चालकाकडे 25 हजार रुपयांची मागणी केली होती. यावेळी प्रशांत मिठबावकर यांनी तू कशाला पैसे मागतो. ते दोघे काय ते बघतील, असे सांगितले. याचा राग आल्याने सुधीर याने फिर्यादीला मारहाण केली होती. याप्रकरणी अमृत नार्वेकर यांनी मालवण पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार संशयितांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार मदन खोत याला 15 रोजी अटक झाली आहे. त्याला 18 तारीख पर्यंत पोलीस कोठडी नंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सद्यस्थितीत तो न्यायालयीन कोठडीत आहे. तर सुधीर याने जिल्हा व सत्र न्यायालयाकडे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. गुन्ह्यात वापरलेली हत्यारे आणि चोरीला गेलेली फिर्यादीची चैन हाती आलेली नाही. त्यामुळे या संशयितांवर चोरीचा गंभीर गुन्हा आहे. तसेच जामिनावर मुक्त झाल्यास गुह्यात वापरलेल्या हत्याराची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट करण्याची शक्यता असल्याने जामीन मंजूर करण्यात येऊ नये असा युक्तिवाद सरकारी पक्षाकडून करण्यात आला होता. हा युक्तिवाद ग्राह्य मानात न्यायालयाने सुधीर खोत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला असल्याची माहिती वकील रुपेश देसाई यांनी दिली.

You cannot copy content of this page