अणसुर-पाल येथील राजन राऊळ यांचा अकस्मित मृत्यू

⚡वेंगुर्ला ता.१०-: अणसूर-पाल तळेबांधवाडी येथील राजन शिवराम राऊळ (५०) यांचे आकडी येऊन झालेल्या आजारात निधन झाले. यासंदर्भात वेंगुर्ला पोलिसात अकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे.

  अणसुर-पाल येथील राजन शिवराम राऊळ (५०) यांना रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आकडी येऊ लागल्याने त्यांना तुळस पाथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचाराकरिता वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र त्यांच्यावर उपचार होण्याआधीच त्यांचे निधन झाल्याचे उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी स्पष्ट केले. यासंदर्भात संजय मनोहर आंगचेकर यांनी दिलेल्या खबरीनुसार वेंगुर्ला पोलिसात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचे मार्गदर्शनाखाली महिला हेड कॉन्स्टेबल रंजीता चौहान करत आहेत.

You cannot copy content of this page