वेंगुर्ला प्रतिनिधी-भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशाल महोत्सवात वेंगुर्ला येथे १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता मधूसुदन कालेलकर सभागृह येथे ‘विशाल श्री‘ ही सिंधुदुर्ग जिल्हा खुली शरिरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले आहे.
या स्पर्धेचे खास आकर्षण म्हणजे यावेळी मिस्टर वर्ल्ड, मि. आशिया, मि. इंडीया, व महाराष्ट्र श्री चॅम्पियन पूणे येथील महेंद्र चव्हाण यांचा बॉडी बिल्डिंग शो, तसेच मि.वर्ल्ड, मि. आशिया, टॉपफायनालिस्ट, मि. ऑलिफिक अॅमिचल मंगेश गावडे मुंबई या दोन सेलिब्रिटींजचा बॉडी बिल्डिंग शो होणार आहे.
ही जिल्हास्तरीय स्पर्धा खुली असल्याने व कोणत्याही असोसिएशनशी निगडीत नसल्याने जिल्ह्यातील १५० स्पर्धेक या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
ही स्पर्धा ५५ , ५५ ते ६०, ६० ते ६५, ६५ ते ७० , ७० ते ७५, व ७५ किलो वरील अशा वजनी गटात होणार आहे. या स्पर्धेसाठी ३०००, २५००, २०००, १५००, व १०००, अशी बक्षिसे प्रत्येक गटांसाठी असणार आहेत. तसेच मेन फिजीकसाठी ३५००, ३०००, २५००, २०००, १५००, व १००० अशी सहा बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच बेस्ट पोझर २५००, मोस्ट इंपो २५००, व बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप साठी १० हजारचे पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच या स्पर्धेतील विजेत्यांना ट्राॅफी व मेडल देण्यात येणार आहे.
या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी गोवा-पार्से येथील मतदार संघाचे आमदार जीत आरोलकर, तसेच भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, युवा नेते विशाल परब व जिल्ह्यातील भाजपाचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत.
यावेळी जास्तीत जास्त स्पर्धकांनी व बॉडी बिल्डिंग शो पहाण्यासाठी युवा वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन विशाल परब मित्रमंडळाचे बाळू देसाई, प्रणव वायंगणकर व साई भोई यांनी केले आहे.
