गणित संबोध परीक्षेत विद्यामंदिर कणकवलीच्या विद्यार्थ्यांचे सुयश

⚡कणकवली ता.०८-: गणित अध्यापक मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा अध्यापक मंडळ गणित संबोध परीक्षा रोजी घेण्यात आली होती. सदर परीक्षेत विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवलीच्या खालील विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले.

इयत्ता आठवी-१) आदित्य अच्युतराव वणवे १००% २) आदित्य अमोल खानोलकर १०० %, ३) केयूर प्रशांत साठविलकर १००% ४ ) कोमल रामचंद्र भानुसे १००% ,५) ध्रुव आनंद तेंडुलकर ९८% ,६) अथर्व परशुराम कोचरेकर ९८%,७) वेदांग मंदार दळवी ९८% ,८) सिद्धेश गणेश तांबे ९६ %
इयत्ता पाचवी-१) मैत्रेयी मनोज हिर्लेकर ९६ % ,२) वैभवी विनायक बाई ९६%,३) मोहित निळकंठ सुतार ९६ % ,४) राजवर्धन भाऊसाहेब कापसे ९४% ५) तनिष्क राजदीप वारीक ९४%
६) मनस्वी मनोज पिळणकर ९२% ७) शिवांग सुदिन पेडणेकर ९०% सदर परीक्षेला इयत्ता आठवीचे ४९ विद्यार्थी व इयत्ता पाचवीचे ३२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागला असून वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीचे चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे , सेक्रेटरी बाळासाहेब वळंजू, अध्यक्ष दत्तात्रये तवटे,खजिनदार अनिलपंत डेगवेकर, प्रशालेचे मुख्याध्यापक भारत सरोदे, पर्यवेक्षक पी. जे. कांबळे यांनी अभिनंदन केले. सदर यशस्वी विद्यार्थ्यांस गणित विषय शिक्षक सूर्यकांत खरात, नेताजी जाधव, संदीप नागभिडकर,प्राची आंबेरकर यांचे मार्गदर्शन लाभले.

You cannot copy content of this page