⚡वेंगुर्ला ता.०९-: माझा वेंगुर्ला व किरात ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच उषःकाल अभिनव मल्टी-सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, सांगली या अद्ययावत हॉस्पिटलच्या सहकार्यान ९ ऑक्टोबर रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कॅम्प येथील नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशिय सभागृहात दुपारी ३ ते ६ या वेळेत होणा-या या शिबिरात हृदयरोग तज्ज्ञ, अस्थिव्यंग शल्यचिकित्सक, स्त्रीरोग तज्ज्ञ, जनरल सर्जन/फिजिशियन आदींचे तज्ज्ञ उपस्थित राहून तपासणी करणार आहेत. संबंधित आजारावर मोफत प्राथमिक औषधे वाटप केली जाणार आहेत. तर निशुल्क इ.सी.जी. आणि टुडी इको तपासणीही होणार आहे. तरी रुग्णांनी या मोफत महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन माझा वेंगुर्ला, किरात ट्रस्ट व समन्वयक डॉ. अमेय देसाई यांनी केले आहे.
