⚡वेंगुर्ला ता.०८-: मठ-कणकेवाडी येथील सायली गावडे या युवतीचा खून केल्याच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयित आरोपी गोविंद उर्फ वैभव दाजी माधव (३८) रा. परुळे याचा जामीन अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी नामंजूर केला आहे. सरकार पक्षाच्यावतीने सहाय्यक सरकारी वकील रुपेश देसाई, तर फिर्यादीतर्फे अॅड. अजित भणगे, अॅड. मिहीर भणगे, अॅड. सागर ठाकुर, अॅड. सुनील मालवणकर, अॅड. स्वप्ना सामंत यांनी काम पाहिले.
युवतीच्या खून प्रकरणी संशयिताचा जामीन फेटाळला
