वागदेसह ३ गावांतील भातपिक नुकसानभरपाईचे प्रस्तावच दाखल नाहीत

विरोधी पक्षनेते दरेकर यांनी प्रत्यक्ष केली होती नुकसानीची पाहणी;तलाठ्याचा हलगर्जीपणा शेतकऱ्यांना भोवला

*💫कणकवली दि.०१-:* संप्टेबर ऑक्टोबर मध्ये अतिवृष्टीमुळे कणकवली तालुक्यातील वागदेसह सातरल ,कासरल गावांतील शेतकऱ्यांच्या झालेल्या भातपिक नुकसानीचे क्षेत्र निश्चितीसाठी जमिनीचे ७ / १२ तलाठ्याने दिले नसल्याने नुकसानभरपाई चे प्रस्तावच अद्याप शासनदरबारी दाखल झाले नसल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. सप्टेंबर – ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेल्या उभ्या पिकाची नुकसानी झाली होती. सिंधुदुर्ग च्या दौऱ्यावर आलेल्या विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी वागदे गावात शेतकऱ्यांच्या बांधावर जात भातपिकनुकसानीची पाहणी केली होती. तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई चे परिपूर्ण प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश महसूल आणि कृषी यंत्रणेला दिले होते. मात्र फेब्रुवारी महिना उजाडला तरीही वागदे सह सातरल आणि कासरल गावांतील भातपिक नुकसानीचे प्रस्ताव दाखल झाले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत कृषी अधिकारी शिवाजी हजारे यांना विचारणा केली असता वागदे तलाठ्याने अद्याप अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे ७ / १२ दिले नसल्याने नुकसानभरपाई प्रस्ताव सादर केला नसल्याचे सांगितले.

You cannot copy content of this page