जिल्हाधिकारी यांच्या प्रवेशद्वारावरील घंटानाद आंदोलन पाचव्या दिवशीही सुरू

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०१-:* उदयजी सामंत उच्च तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग यांनी गतवर्षीच्या उपोषणाच्या वेळी दिलेल्या आश्वासनाकडे म्हणजे च जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण योजना सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील अनुसूचित जाती म्हणजेच महार, चांभार आणि नवबौद्ध या वस्त्यांमध्ये नाविन्यपूर्ण योजना आमच्या जिल्ह्याचे आत्तापर्यंतचे सर्व जिल्हा नियोजन समितीचे सभासद, सदस्य, पदाधिकारी यांनी राबवलीच नाही, किमान चालू वर्षापासून तरी लाभ मिळावा म्हणून दिनांक २६ जानेवारी २०२१ रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्थापित बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या माध्यमातून एक दिवस उपोषण केले. उपोषणाला माजी आमदार मा. प्रमोदजी जठार, विधानपरिषदेचे माजी आमदार मा.राजन तेली यांनीही भेट दिली, मा. संदेशजी पारकर यांनी भेटी दिल्या परंतू याप्रकरणी त्यांचेकडूनही काही समाधान झाले नाही. तत्पूर्वी मा.ना. उदयजी सामंत उच्च तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती चे अध्यक्ष यांनी भेट दिली परंतू समाधानकारक न्याय मिळाला नाही , म्हणून दिनांक २८ जानेवारी २०२१ पासून मा. के मंजुलक्ष्मी जिल्हाधिकारी यांच्या प्रवेशद्वारावर मा. ना. उदयजी सामंत उच्च तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग तसेच सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीचे पदाधिकाऱी यांचेसह सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या पदाधिकारी यांचे लक्ष वेधण्यासाठी घंटानाद आंदोलन कामकाजाच्या दिवशी सकाळी १० ते संध्याकाळी १७ या वेळेत सुरू केले. असता मा. अविनाश लक्ष्मण भोसले प्रभारी अधिकारी पोलिसांनी वाद्य वाजविण्याची बंदी घातली, म्हणून फक्त घंटानाद आंदोलन सुरू आहे. आजचा ५ वा दिवस उजाडला आहे. या ५ दिवसात आमच्या वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.नितेशजी राणे साहेब यांनी भेट दिली, त्यावेळी त्यांना या योजनेपासून प्रशासनाने अनभिज्ञ ठेवले की काय अशी शंका निर्माण झाली आहे. आमच्या प्रमुख मागण्या विशेषत: (१) अनुसूचित जाती(महार, चांभार) आणि नवबौद्ध समाजाला नाविन्यपूर्ण योजनेचा लाभ मिळण्यासाठी शासनाने दिलेल्या आदेशानुसार आराखडा तयार करून एक प्रत आम्हाला दिली जात नाही (२) शासनाने २७ ऑगस्ट २०१४ अ.नं.७ च्या योजनेबद्दल दिलेल्या निर्णयानुसार ग्रामीण भागात इंटरनेट सेवा मोठ्या देवळात, जिल्हा परिषद समाज मंदिरे, तालुका स्तरावरील बौद्ध विहारामध्ये संबंधित संस्था चालकांशी विचार विनिमय करून इंटरनेट सेवा उपलब्ध करून देईपर्यंत. (३) सिंधुदुर्गवाशियांच्या आरोग्याच्या नावाखाली हाफकिन संस्थेला दिलेल्या जवळजवळ रुपये १ कोटी ची उपकरणे मिळेपर्यंत (४) सिंधुदुर्ग जिल्हा अल्पसंख्याक विकास कमिटी स्थापन करून त्या कमिटी मध्ये सदस्य करेपर्यंत (५) डॉ बाबासाहेब आंबेडकर संस्थापित दि बुध्दिष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा नोंदणी क्रमांक ३२२७/९८२एफ चा अनाधिकारे वापर करणारांवर मा. उदयजी सामंत उच्च तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री महोदयांनी ११ फेब्रुवारी २०२० रोजी च्या बैठकीत दिलेल्या आदेशानुसार फौजदारी गुन्हा दाखल होईपर्यंत (६) या नाविन्यपूर्ण योजनेतून सर्व साधारण गटांच्या नावाखाली जवळजवळ १६ कोटी रुपये नियमबाह्य खर्चाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात येईपर्यंत, (७) नाविन्यपूर्ण योजनेतून कायमस्वरूपी निर्माण केलेल्या उदाहरणार्थ सेवानिवृत्तांसाठी लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या सभागृहाचे मालमत्तेचे मा. पालकमंत्री महोदयांकडून उद्घाटन होत नाही तोपर्यंत घंटानाद आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या आंदोलनाला प्रशासनाकडून दाद मिळत नसल्याने कोकण विभागीय आयुक्तांना आजच निवेदन सादर केले असून दिनांक २ फेब्रुवारी पासून दिनांक ७ फेब्रुवारी २०२१ पर्यंत हे आंदोलन स्थगित करुन दिनांक ७ फेब्रुवारी पर्यंत दाद घेतली नाही तर दिनांक ८ फेब्रुवारी २०२१ पासून मा. कोकण विभागीय आयुक्तांच्या प्रवेशद्वारावर न्याय मिळेपर्यंत घंटानाद आंदोलन वाद्यांच्या गजरात स्पीकर लावून करणार आहे. रावजी गंगाराम यादव जिल्हाध्यक्ष दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा सिंधुदुर्ग.

You cannot copy content of this page